स्थैर्य, भुईंज, दि.२३ : पुणे विभाग शिक्षक व पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार व पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना मोठ्या मताधिक्यने विजयी करा, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
वाई येथे आयोजित बैठकीत प्रचाराचा प्रारंभ करताना ते बोलत होते. माजी आमदार व किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य ऍड. जगदीश पाटणे, भाजपचे वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, “किसन वीर’चे संचालक मधुकर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, संतोष जमदाडे, प्रा. प्रशांत सुतार, नगरसेवक महेंद्र धनवे, नगरसेविका वासंती ढेकाणे उपस्थित होते.
कोपर्डे हवेलीत सिध्दनाथ-माता जोगेश्वरी हत्तीवर स्वार; आकर्षक पूजेने वेधले लक्ष
आजपासून नियोजन करून, तसेच मतदारांना मतदान प्रक्रिया समजावून देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. निष्क्रिय सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीनंतरची ही निवडणूक असल्याने मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला योग्य संदेश द्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला वाई विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही मदन भोसले यांनी दिली. ऍड. जगदीश पाटणे यांनी वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदार नोंदणी केल्याचे सांगितले.