दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२३ । मुंबई । काल जळगाव येथील पाचोरामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करत नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो. पण, ते जेव्हा भाजचे नेते, हुकूमशहा म्हणून वागतात तेव्हा नक्कीच टीका केली जाईल. हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून नेहमी त्यांचा आदर आहे. पण, त्यांच्या चुकांबद्दल बोलणाऱ्यांना ते तुरुंगात टाकत असतील तर नक्कीच आम्हाला त्यांच्यावर बोलाव लागेल त्यासाठी बावनकुळे यांची परवानगी घ्यावी लागणार नाही, असंही राऊत म्हणाले.
“तुम्हाला आमची, महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरेंच्या सभांची भीती वाटते. मुख्यमंत्री बदलाची दिल्लीत सध्या हालचाली सुरू आहेत. कारण हे मुख्यमंत्री भाजपला जे हव आहे ते साध्य करण्यात अपयशी ठरले आहेत. हे सरकार आल्यापासून मिंधे गटासोबत भाजपही रसातळाला जात आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
” उद्धव ठाकरेंच्या काळात कोरोनाच मोठ संकट आलं होतं. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या राज्याच्या तुलनेत चांगल काम केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच महत्व राहणारच आहे. काल पवार साहेब यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, असंही राऊत म्हणाले.