शिवशाही बस पलटी, एसटी गेली खड्ड्यात.

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । नागठाणे | सातारा तालुक्यातील नागठाणे व रामकृष्ण नगर येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन लेनवर दोन बसचे अपघात झाले. सातारा-कराड लेनवर रामनगर येथे शिवशाही बस पलटी झाली तर कराड – सातारा लेनवर नागठाणे हद्दीत एसटी बस नाल्यात गेली. यापैकी रामनगर येथील अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड लेनवर कारने हुलकावणी दाखवल्याने शिवशाहीवरील चालकाचा ताबा सुटला आणि शिवशाही बस महामार्ग नजीकच्या खड्ड्यात पलटी झाली. यामध्ये अठरा प्रवासी होते. यापैकी गंगुबाई शिवाजी पुजारी, हेमा अण्णाप्पा जाधव, सरुबाई अन्नप्पा जाधव, अमित अशोक भागवत, मोहन सावंत व आणखी एक जण असे सहा जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग हेल्पलाइन इन्चार्ज दस्तगीर आगा बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय देसाई घाडगे हवलदार वाघ तसेच म्बुलन्सचे समीर केंजळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना नागठाणे येथे उपचारासाठी पाठवले.
दरम्यान, कराड ते सातारा लेनवर नागठाणे हद्दीत कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एसटी चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस महामार्ग नजीकच्या नाल्यात गेली. यामध्ये वीस प्रवासी होते मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. हायवे हेल्पलाइन कर्मचारी तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!