शिवराय फक्त आचारात नकोत, विचारात पण हवेत – प्रा. रविंद्र येवले

तिरकवाडी येथे आंतरराष्ट्रीय युवक दिन उत्साहात साजरा


दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
शिवराय फत आचारात नकोत, विचारात पण हवेत, असे प्रतिपादन प्रा. रवींद्र येवले यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण अंतर्गत ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ व जय भवानी हायस्कूल, तिरकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी प्रा. रविंद्र येवले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने युवक वर्ग प्रभावित झाला.

कृषीदूत आदित्य खलाटे, आदित्य कुंभार, ऋषीकेश जगताप, आकाश निंबाळकर, प्रथमेश जायपत्रे, प्रशांत मचाले, प्रसाद चांदगुडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

जय भवानी हायस्कूल व जुनियर कॉलेज तिरकवाडीचे प्रा. श्री. काळे सर व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितीशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!