शिवसेनेच्या ठाकरे गटाचे यमदूत खड्डयात झोपवून साताऱ्यात अनोखे आंदोलनं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून सातारकरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने त्याच्या निषेर्धात शिवसेना (ठाकरे) गटाच्यावतीने यमदूत खड्यात झोपवून अनोखे आंदोलन केले.

शहरातील प्रत्येक रत्स्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून त्यावर तात्पुरती मुतुम व माती टाकून मलमपट्टी केली जात आहे. यामुळे वारंवार अपघात होणे, धुळीने नागरिकांना त्रास होणे अशा घटना घडत आहेत. मग पालिकेकडे आलेल्या रस्ते दुरुस्तीचा कोट्यवधी रुपये निधी गेला कुठे असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना (ठाकरे) गटाच्यावतीने यम व दोन दूत राजवाडा ते प्रतापगंज पेठ अशी रॅली काढत खड्ड्यात बसून निषेध करण्यात आला. यावेळी खड्यांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद, अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली मुंडीवर पाय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अनिल गुजर, शिवराज टोणपे, प्रणव सावंत, रवींद्र भणगे, सागर धोत्रे, सागर रायते, किशोर घोरपडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!