शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार


स्थैर्य, मुंबई, दि.१७: शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमिवर संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालचा दौरासुद्धा करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!