शिवसेना बिहारमध्ये लढणार ५० जागा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.५: बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि एकूणच महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याची बिहार राज्य सरकारने जोरदार आघाडी उघडली आहे. त्यांच्या या बदनामीच्या षडयंत्राला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत किमान ५० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या जनता दलाने शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आक्षेप घेतल्याने धनुष्यबाणाऐवजी मिळेल ते निवडणूक चिन्ह घेऊन रणशिंग फुंकण्याची सर्व तयारी शिवसेनेने केली आहे.

सन २०१५च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकूण २४३ जागांपैकी ८० जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेला ८० जागांवर मिळून २ लाख ११ हजार १३१ मते मिळाली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!