‘शिवसेना यूपीएत सामील नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये’- अशोक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२७: यूपीएच्या अध्यक्षपदावरुन शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आलेली पाहायला मिळत आहे. यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेस नेत्या सोनिया गांधींऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सामनाच्या अग्रलेखातून यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार असावेत, असे म्हटले होते. त्यावरुन आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘शिवसेना हा पक्ष यूपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरुनच शिवसेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये, असा इशाराच चव्हाण यांनी शिवसेनेला दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!