पुनर्वसित गोळेगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी


दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. फलटण येथे पुनर्वसित गोळेगाव येथेही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दातीर, हेड कॉन्स्टेबल घोरपडे, जगदाळे, बडे, सजणे यांची उपस्थिती होती.

यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंतीला गोळेगावमधील सर्व शिवप्रेमी, सर्व ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. पद्मावती नवतरुण क्रिडा मंडळातील मुलांनी किल्ले सज्जनगड, सातारा येथून शिवज्योत घेऊन गोळेगावपर्यंतचा प्रवास केला. यावेळी गोळेगावमधील सर्व शिवप्रेमींचे पोलीस अधिकारी यांनी कौतुक केले आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!