फलटणची सुकन्या कु. अक्षदा ढेकळेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 03 ऑक्टोबर 2024 | फलटण | वाखरी तालुका फलटणची सुकन्या व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. अक्षदा ढेकळेला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

कु.अक्षदा ढेकळे पुणे क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू असून तिने यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व व नेतृत्व केले असून महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना महाराष्ट्राला अनेक पदके मिळवून दिली आहेत.

त्याचबरोबर तीची भारतीय हॉकी संघात निवड झाल्यानंतर भारतीय हॉकी संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना देशाला देखील अनेक पदके प्राप्त करून दिली आहेत. कु. अक्षदा ढेकळे हिच्या या सन्मानाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!