महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२३ । मुंबई । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाचे तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर होत आहे. नवीन कार्यालय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) भांबुर्डा, आगरकर रोड, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर, पुणे-411004 येथे कार्यरत राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत शासन अंगीकृत राज्यस्तरीय शैक्षणिक स्वायत्त संस्था आहे. परिषदेमार्फत विभागीय परीक्षा, व्यावसायिक परीक्षा, शिष्यवृत्ती विषयक परीक्षा इत्यादीबाबत आयोजन करण्यात येते. परिषदेचे कार्यालय 17, डॉ.आंबेडकर मार्ग, लाल देवळासमोर, कॅम्प, पुणे-411001 येथे कार्यरत होते. सद्यस्थितीत परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याचे प्रयोजन असल्याने तात्पुरत्या स्वरूपात परिषदेच्या कार्यालयाचे सोमवार दि. 3 जुलै 2023 पासून नवीन जागेत स्थलांतर करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांमार्फत देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!