स्थैर्य,मुरादाबाद, दि.१७: देशात पहिल्यांदाच एका महिलेला फाशी होणार आहे. दोषी महिलेला मथुरा येथील महिला तुरुंगातील फाशी घरात लटकवले जाईल. फाशी कधी होईल, याची तारीख अद्याप पक्की केली नाही. पण, फाशी घराची डागडुजी आणि नवीन दोरीची ऑर्डर देण्यात आली आहे. मेरठमध्ये राहणाऱ्या पवन जल्लादने सांगितले की, मथुरा तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे.
आधी बेशुद्ध केले, नंतर कुऱ्हाडीचे वार केले
मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहाच्या बाबनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने 15 एप्रिल 2008 ला आपला प्रियकर सलीमसोबत मिळून वडील शौकत अली, आई हाशमी, भाऊ अनीस अहमद, त्याची पत्नी अंजुम, पुतणी राबिया आणि भाऊ राशिद आणि अनीसच्या 10 महीन्यांच्या मुलाची हत्या केली होती. तिने आधी सर्वांना औषध देऊन बेशुद्ध केले, नंतर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. तपासात समोर आले की, शबनम गरोदर होती, पण कुटुंब तिचे सलीमसोबत लग्न लावून देण्यास तयार नव्हते. म्हणून तिने सर्वांना मारण्याचा डाव आखला.
15 जुलै 2010 ला ट्रायल कोर्टाने दोघांना दोषी करार देत फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंत हायकोर्ट, सुप्रीम कोर्टानेही फाशीला कामय ठेवले होते. शबनमने मुलाचा हवाला देत माफीची मागणी केली होती. 2015 सप्टेंबर UP चे गवर्नर राम नाईक यांनीदेखील शबनमची दया याचिका फेटाळून लावली होती.
1870 मध्ये मथुरा तुरुंगात फाशी घर तयार झाले होते
महिलांना फाशी देण्यासाठी मथुरा तुरुंगात 1870 मध्ये फाशी घर बनवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर या फाशी घरात कोणत्याच कैद्याला फाशी देण्यात आली नाही. अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत पडलेल्या या फाशी घराची डागडुजी करण्यासाठी अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी उच्चाअधिकाऱ्यांना पत्र लिहीले आहे. परंतु, त्यांनी शबनमला फाशी देण्याच्या प्रश्नावर भाष्य केले नाही.