प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकपदी शशिकांत सोनवलकर यांचा दणदणीत विजय


दैनिक स्थैर्य । दि. २० नोव्हेंबर २०२२ । फलटण ।  सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक वाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकपदी दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार शशिकांत सोनवलकर यांचा दणदणीत विजय झालेला आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या फलटण मतदारसंघांमधून शशिकांत सोनवलकर यांनी निवडणूक लढवली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक मताने शशिकांत सोनवलकर हे प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक पदी निवडून गेलेले आहेत.

शशिकांत सोनवलकर हे सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. दुधेबाबी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांना विविध माहिती हवी यासाठी दुधेबाबी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून शशिकांत सोनवलकर कार्यरत आहेत. दरवर्षी दुधेबाबी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्याख्यानमालेचे आयोजन करून राज्यातील नामवंत विचारवंत ते प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार मांडण्यासाठी दुधेबावी येथे बोलवतात. यासोबतच पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा शशिकांत सोनवलकर हे कार्यरत राहिलेले आहेत

आपल्या कार्यातूनच आपली ओळख शशिकांत सोनवलकर यांनी निर्माण केलेली आहे. शिक्षकी पेशा असताना सुद्धा सामाजिक कामकाज कसे करता येईल. यावर शशिकांत सोनवलकर यांचा नेहमीच भर राहिलेला आहे. फलटण तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात शशिकांत सोनवलकर हे नेहमीच आघाडीवर असतात.


Back to top button
Don`t copy text!