
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कै. विजयराव बोरावके यांच्या पत्नी शशिकला बोरावके यांचे वृद्धापकाळाने निधन; आज रात्री फलटण येथे अंत्यविधी.
स्थैर्य, फलटण, दि. १५ फेब्रुवारी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कै. विजयराव बोरावके यांच्या पत्नी श्रीमती शशिकला विजयराव बोरावके यांचे आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच फलटण शहरात व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शांत, साध्या व कुटुंबवत्सल स्वभावामुळे त्या परिसरात आदराचे स्थान मिळवून होत्या. बोरावके कुटुंबाच्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता, अशी भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ठीक ८.०० वाजता फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.
