दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | शरयु ऍग्रो इंडस्ट्रिज लि. साखर कारखाना सन २०२३ – २४ या चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन ३१५१ रुपये एकरकमी विनाकपात दर देणार असल्याची घोषणा कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी केली आहे. प्रथम पंधरवड्यात आलेल्या ऊसाचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणारआहे.
शरयुने अडचणीच्या काळात विविध तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेत गाळप करून त्यांना आर्थिक स्थिरता देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. विविध शेतकरी संघटना प्रतिनिधिंनी केलेली मागणी तसेच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची जादा दर देण्याच्या मागणीचा शरयु प्रशासनाने सकारात्मक दृष्ट्या विचार केलेला असून यापुढेही सर्वाधिक दर देऊन ऊस बिले वेळेवर अदा केली जाणार आहेत.
फलटण, वाई, खंडाळा, भोर, वेल्हा, पुरंदर, जावली, सातारा, कोरेगाव, माण, खटाव, माळशिरस, इंदापूर, बारामती या भागातील कार्यक्षेत्रात ऊस तोडीसाठी नियोजन करण्यात आले आहे. लवकरच वाढीव तोडणी यंत्रणा व अत्याधुनिक हार्वेस्टर मधीनच्या माध्यमातून तोडणी यंत्रणा कार्यरत होणार आहे. शेतकरी सभासदांनी आपला संपूर्ण ऊस शरयुला गळपसाठी घालून सहकार्य करण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले आहे.