कर्नाटकातील निकालांनंतर शरद पवारांचं भाष्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १३ मे २०२३ । मुंबई । कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कर्नाटकच्या जनतेनं कायम ठेवत यावेळी काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलाय. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या जनतेचं आणि काँग्रेसचं अभिनंदन केलं. तसंच महाराष्ट्रातील लोकांनाही आता बदल हवा असल्याचं ते म्हणाले.

“मी महाराष्ट्रात आमच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. मी उद्धव ठाकरेंची भेट घेईन आणि यावर चर्चा करेन. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, आम्हाला एकत्र बसून पुढील योजना आखायला हवी. मी याबद्दल सर्वांशी चर्ता करेन,” असं शरद पवार म्हणाले.

मोदी है तो मुमकिन है या विचारांना लोकांनी नाकारलंय. महाराष्ट्रातील जनतेलाही आता बदल हवे आहेत. आम्ही वेगवेगळं लढण्याचा प्रश्न नाही. आता तिन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि छोट्या पक्षांना भरवला दिला पाहिजे. परंतु आपण हा निर्णय एकटे घेणार नसून, सर्व सहकाऱ्यांसोबत यावर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारत जोडो कामी आलं

“केरळ, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये भाजप सत्तेतून बाहेर आहे. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा आपण कर्नाटक निवडणुकीवरून देशातील परिस्थितीचा अंदाज घेऊ शकतो. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्र कर्नाटकात कामी आली असं म्हणता येऊ शकतं.आम्ही काही घोरणात्मक निर्णय घेतले होते, ज्या ठिकाणी महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार असतील तिकडे आम्ही उमेदवार देणार नाही. आम्ही तिकडे प्रचारही केला नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीनं मराठी लोकांना विश्वास दिला होता, परंतु तिकडे अन्य पक्ष आणि समितीचं एकमत झालं नाही. त्यामुले त्यांना पराभव स्वीकारावा लागला,” असंही त्यांनी नमूद केलं.


Back to top button
Don`t copy text!