दैनिक स्थैर्य | दि. १३ एप्रिल २०२४ | फलटण |
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी शुक्रवारी आपले कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या माजी खासदार संभाजीराव काकडे, बाबालाल काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी श्रीमती कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झाले आहे. शरद पवार यांनी काकडे कुटुंबियांचे यावेळी सांत्वन केले. याप्रसंगी फलटण तालुक्याचे युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांची उपस्थिती होती.
फलटण तालुक्यातील राजकीय परिस्थितीबाबत सह्याद्री चिमणराव कदम यांच्याशी शरद पवार यांनी यावेळी संवाद साधला.
याप्रसंगी सौ. आशालता काकडे, शामराव काकडे, राहुल काकडे, पृथ्वीराज काकडे, सतीश काकडे, शामकाका काकडे, सह्याद्री चिमणराव कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.