
दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२२ । फलटण । रयत शिक्षण संस्था व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस कृतज्ञता सप्ताह म्हणून रयत शिक्षण संस्थेचे श्री जीतोबा विद्यालय जिंती तालुका फलटण येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहात विद्यालयात वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी, क्रिडा स्पर्धांचे आयोजन उत्साही वातावरणात करण्यात आले होते याला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री राजेंद्र रणवरे, श्री.एन. रणवरे,श्री एम. एन. रणवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री जगदेवराव रणवरे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. स्कूल कमिटी सदस्य श्री पी.एन. रणवरे व श्री एम.एन. रणवरे व उपशिक्षक श्री पी.बी.माने यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून आपण त्यांच्यापासून प्रेरणा व ऊर्जा घेऊन जगले पाहिजे तसेच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत असे सांगीतले. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका सौ विद्या शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार श्री रमेश बोबडे यांनी मानले.
कृतज्ञता सप्ताहातील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौ बनकर एस. एस.,सौ सोनवलकर ए.ए. श्री सोळंकी ए.आर, श्री ताराचंद्र आवळे,सौ जगताप पी.जे. सौ जगदाळे जी. एस. यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गोविंद खिलारी, राजेंद्र घाडगे, गजानन धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.