स्थैर्य, सातारा, दि. 13 : भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ती शैला यादव यांच्या नेतृत्वाखाली समावेशक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्हयात आजच्या तारखेपर्यंत जवळपास 403 कुटुंबातील लोकांना अन्नधान्य, किराणा सामानाचे वाटप करण्यात आले आहे अजूनही अनेक ठिकाणी मदतीचे कार्य सुरूच आहे.
पालवरील भटक्याना आधार: कोरोना काळात अचानक लॉकडाऊन झाल्यानंतर काहीतरी पारंपरिक कामधंदा करणाऱ्या पालवरील भटक्या समजातील नागरिकांना खूप मोठा आधार समावेशक संस्थेच्या मदतीचा झालेला आहे. संस्थेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील औंध, खटाव, आकले, गोगावलेवाडी, कुडाळ, पानमळेवाडी, चारभिंती, केसरकर पेठ, पुणे जिल्ह्यातील निरा, वीर इत्यादी ठिकाणी भटके विमुक्त, लोककलावंत, शेतमजूर आणि धुणीभांडी करणाऱ्या कुटुंबातील लोकांना मदतीचे वाटप करण्यात आले.
सामजिक संस्थेच्या मदतीच्या वाटपात मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती आणि संस्थांचे शैला यादव यांनी आभार मानले आहे. मदतीचे वाटप करण्यात अनेकांनी सहकार्य केले त्यामध्ये प्रामुख्याने ईकोनेट संस्था पुणे, चद्रकांत कांबळे पोलीस आधिकारी, जेष्ठ पत्रकार
कॉ. विजय मांडके , सातारा, संदिप सारंग, विकी कसबे, अभिनव मोरे प्रा. सतिश चौगुले, कैलास रणदिवे, दिनेश गाडे ,गणेश जावळे, प्रा. अर्जुन लाखे, एकलव्य ग्रुप,संविधान प्रचारक टिम अनविता सिंग,अरूण जावळीकर, महेश गुरव, अक्षय भोसले, रमेश यादव, सुमित भोसले, राहुल मोरे यांचा समावेश होता.
आता लॉकडाऊन संपण्याकडे वाटचाल होत असून भटक्या विमुक्त समाजातील लोकांना अजूनही मदतीची गरज आहे त्यामुळे संस्थेला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.