
स्थैर्य, सातारा, दि. १६ : शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या ग्रामदक्षता कमिटीने गावात विविध ठिकाणी मोहीम राबवून फिजिकल डिस्टन्स न ठेवणाऱ्या, मास्क न वापरणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, डबल सीट फिरणाऱ्यांकडून आठ हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला.
शाहूपुरी ग्रामपंचायतीने पथके तयार करून शाहूपुरी मोळाचा ओढा, करंजे नाका, दौलतनगर, आदी परिसरात कारवाई केली. त्यानुसार संबंधित दुकानदारांना सामाजिक अंतर बाबत समज देण्यात आली. येथून पुढे कारवाई सुरूच राहणार आहे. सर्व ग्रामस्थांनी सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन सरपंच गणेश आरडे यांनी केले आहे. या मोहिमेत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे एम. जी. कोकणी, विकास शिंदोळकर, शाहूपुरीचे ग्रामविकास अधिकारी एम.व्ही.कोळी, पोलीस पाटील अर्जुन पवार, कृषी सहायक नलावडे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल खंडागळे, सौरभ चौधरी, रविराज गायकवाड, विजया निलाखे, वैशाली जाधव यांनी सहभाग घेतला होता.