स्थैर्य, सातारा, दि.०९: येथील मंगळवार पेठेत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने छापा टाकून अवैध मद्यविक्री करणार्यास एकास ताब्यात घेतले. गणेश मारुती निवळे रा.मंगळवारपेठ सातारा असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून 2012 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहित अशी, सातारा शहरातील मंगळवार पेठ खडकेश्वर मंदिर चौक ते होलार गल्ली रोडक्षया कडेला असलेल्या बोळात एकजण अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने दि. 7 रोजी सायंकाळी अचानक छापा टाकला व इसमास लाल पांढर्या रंगाचे पोत्यासह ताब्यात घेण्यात आले. पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारू टँगो पंच व देशी दारू मनोरंजन संत्रा असे एकूण 2012 रुपये किमतीच्या 35 दारूच्या बाटल्या मिळून आल्या. हा मुद्देमाल जप्त करून संशयिताविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन करण्यात आला आहे.
ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी पो.ना. सचिन माने, स्वप्नील कुंभार यांनी केली आहे.