स्थैर्य, इस्लामाबाद, दि. 13 : गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरूध्द बेताल वक्तव्य करणाऱ्या शादिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. खुद्द आफ्रिदीनेच ही माहिती दिली आहे.
गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली आहे. करोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली असून यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज आहे, असे ट्टीट आफ्रिदीने केले आहे.
क्रीडा क्षेत्रात आणि क्रिकेटमधील काही खेळाडूंना याआधी करोनाची लागण झाली होती. पण एखाद्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला करोना व्हायरसची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे.
आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे. त्याने काश्मीर संदर्भात देखील भारतावर टीका केली होती. आफिदीच्या या बेताल वक्तव्यावर भारतीय क्रिकेटपटूंनी त्याचा समाचार घेतला होता. आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील करोनाग्रस्त लोकांना तसेच अन्य नागरिकांना मदत करत आहे. त्याने सोशल मीडियावरून मदत कार्याचे फोटो शेअर केले होते. पण ही मदत करत असताना त्याने अनेक वेळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीर संदर्भात बेताल वक्तव्य केले होते.