एसटी वाहकाकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जानेवारी २०२२ । सातारा । वाई एसटी आगारामध्ये सक्रिय असणाऱ्या वाहकाने दोन अल्पवयीन मुलींचा गर्दीचा फायदा घेऊन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग आणि पोक्सो अंर्तगत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दीपक शिवराम केंडे असे संबंधित वाहकाचे नाव आहे

यासंदर्भातील माहिती अशी दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान वाई ते बालेघर जाणाऱ्या एसटी बस मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा प्रवास सुरू असताना एसटी मोठा पूल येथे आली असता वाहकाने गर्दीचा फायदा घेऊन तिकीट काढत असताना फिर्यादी आणि तिची मैत्रीण या दोघीशी लज्जास्पद वर्तन केले . या प्रकरणी उपनिरीक्षक सोमदे अधिक तपास करत आहेत


Back to top button
Don`t copy text!