
स्थैर्य, पांचगणी, दि. 29 : येथील युवतीच्या घरात शिरून विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, महाबळेश्वर येथील प्रताप रामदास जाधव वय 27 व अन्य एकाने संबंधित युवतीच्या घरी जबरदस्तीने शिरून तिचा विनयभंग केला. संशयीतानंनी युवतीला हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या दुचाकीचीही मोडतोड केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार कदम तपास करत आहेत.
वाढे चौकात एकास पाईपने मारहाण
स्थैर्य, सातारा, दि. 29 : वाढेचौक, सातारा येथे एकास विनाकारण लोखंडी पाईपने मारहाण करून जखम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, दत्तात्रय गुलाब कांबळे हे चालक आहेत. त्यांना सुरेश जिजाबा नलवडे व राजेंद्र जाधव दोघेही रा. वाढे फाटा अशी संशयीतांची नावे आहेत. संशयीतांनी विनाकारण पाईपने तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार कदम कदत आहेत.