दैनिक स्थैर्य | दि. २३ मार्च २०२४ | फलटण |
दैनिक लोकमतचे पत्रकार, आमचे सहकारी मित्र श्री. विकास शिंदे यांच्या मातोश्री, ज्येष्ठ लेखिका सौ. सुलेखा सुरेश शिंदे यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ८ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून मलठण येथून निघून फलटण येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.
त्यांच्या परिवाराच्या दुःखात सर्व मित्र परिवार व समाजबांधव सहभागी आहेत. लेखिका सौ. सुलेखा शिंदे यांना सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.