
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २१ सप्टेंबर २०२५ : सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे हरिष चंदरराव काकडे, जे ‘नाना’ या नावाने परिचित होते, यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
शहरातील नारळी बाग येथील राहत्या घरी आज, रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे फलटणच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
