दैनिक स्थैर्य | दि. 13 मार्च 2024 | फलटण | फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकार्य सुभाषराव शिंदे यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले आहे.
उद्या दि. १४ मार्च रोजी सकाळी फलटण येथील “जिद्द” या निवासस्थानी सकाळी 8 ते 10 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर त्यानंतर सकाळी 11 वाजता शिंदेवाडी येथे अंत्यसंस्कार संपन्न होणार आहेत.