फलटण तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी कालवा जोड प्रकल्प मार्गी : खासदार रणजितसिंह


दैनिक स्थैर्य | दि. 13 मार्च 2024 | भोर | आगामी काळामध्ये फलटण तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण कार्यरत आहोत. धोम – बलकवडी कॅनॉलमध्ये नीरा – देवधरचे कॅनोलचे पाणी सोडण्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. त्या कामाचे आता टेंडर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहे; अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

खंडाळा तालुक्यातील उतरवली या गावामध्ये धोम – बलकवडी कॅनॉलची पाहणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार रणजितसिंह म्हणाले की; सदरील प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे विशेष आभार आज फलटण तालुक्याचे मानत आहेत. ना. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आज फलटण तालुका दुष्काळमुक्त होणार आहे. या कालवा जोड प्रकल्पाचे कामकाज हे दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर फलटण तालुक्यात पाण्याची कमतरता पडणार नाही.

“कमळ” हाच आमचा उमेदवार : खासदार रणजितसिंह

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून कोणताही आदेश अद्याप आला नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फलटण तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत “कमळ” हाच आपला उमेदवार आहे; असे मानून आम्ही सर्व कार्यकर्ते कार्यरत राहणार आहोत; असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!