दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२४ | फलटण | ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून संविधान समर्थन समिती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. प्रा.रमेश आढाव यांनी प्रचारांमध्ये आघाडी घेत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व शेतकऱ्यांना आपली भूमिका पटवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधव, शेतकरी मजुरांना आपली भूमिका स्पष्ट करीत आहेत. एकंदरीतच त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा चौरंगी लढत दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे दिपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिन पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रा.रमेश आढाव हे कडवी लढत देत आहेत.
प्रा.आढाव हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी व शेतकरी मजुरांशी संवाद साधून त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची व संविधान समर्थन समितीची भूमिका समजून सांगत आहेत. त्यांना प्रतिसाद सुद्धा उस्फुर्त मिळत आहे.