ज्येष्ठ पत्रकार के. एम. शहा अनंतात विलीन : शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२३ | पुणे |
दै. लोकसत्ता, दै. विशाल सह्याद्री, दै. केसरी आदी वृत्तपत्रांचे पुणे जिल्हा निवृत्त प्रतिनिधी, बिबी, ता. खेडचे सुपुत्र के. एम. शहा यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८३ व्या वर्षी पत्रकार नगर, सेनापती बापट रोड, पुणे येथील निवासस्थानी नुकतेच निधन झाले. वैकुंठ स्मशान भूमी, पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्कालीन केंद्रीय कृषी, संरक्षण मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री खा. शरद पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे तत्कालीन सभापती व दै. केसरीचे संपादक स्व. जयंतराव टिळक, दै. विशाल सह्याद्रीचे संपादक खा. स्व. अनंतराव पाटील, माजी आमदार व पुणे जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती सभापती स्व. दत्तात्रय वळसे पाटील, खेड तालुका काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष स्व. बाबुभई शहा, माजी आमदार राम कांडगे, माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील, स्व. साहेबराव सातकर वगैरे पुणे जिल्ह्यातील नेत्यांचे स्व. के. एम. शहा यांचे घनिष्ठ सबंध होते.

पत्रकार नगर, पुणे येथील राहत्या घरापासून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, मित्रमंडळी आणि पत्रकार सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!