दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । मुंबई । कल्याणराव आळंदकाका म्हणजे सोसायटी मधील हर्ष, उत्साह, आनंदाचा वाहता झराच जणू.. आता ते आपल्यात नाहीत असे आपले मन अजूनही मानायला तयार नाही. कारण नात्यात गुंफलेली माणसे अशीच व्यापून राहतात. काकांच्या तजेल चेहऱ्यावरील निरामय हास्य सांगे, ‘दुःख उगाळत बसू नका, हसत रहा, संवादी रहा, नाती जपा !’ हाच त्यांच्या जीवनाचाही निष्कर्ष आणि संदेश आहे. अशा शब्दात.. आदर्श ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित शोकसभेत अंकुश माने, सिद्रामप्पा गोविंदे, शिवाजीराव क्षीरसागर, हनमंतु गजेली, त्र्यंबकराव जाधव, अशोक दंडी, दौलतराव भैरामडगी, विश्वनाथ काळे, रमेश नंदुर, किसनराव जाधव, विरप्पा कोरे, संजय जोगीपेटकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. प्रारंभी सर्व उपस्थितांनी आळंद काकांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. यावेळी कांतू खुने, बब्रुवाहन पवार, रामचंद्र बिराजदार, तानाजी साळुंखे आदी ज्येष्ठांसह बहुसंख्य मंडळी उपस्थित होती. शेवटी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.