फलटणमधील ज्येष्ठ उद्योजक अरविंद शहा-वडूजकर यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |

फलटणमधील ज्येष्ठ उद्योजक अरविंद रूपचंद शहा (वडूजकर) यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८३ व्या वर्षी दु:खद निधन झाले. ते फलटण व परिसरात ‘दादा’ या नावाने ओळखले जात होते.

अरविंद दादा हे फलटण एज्युकेशन सोसायटीचे व्हा.चेअरमन होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले व्यावसायिक आहेत.

अरविंद दादा यांच्या निधनाबद्दल फलटणमधील व्यापारी व उद्योजक व त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचा अंत्यविधी आज, रविवार, दि. १५ रोजी सायंकाळी ४ वाजता फलटण येथे होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!