बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.21: जावली तालुक्यात ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. या प्रकल्पला पाणी आरक्षण मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने  बोंडारवाडी ग्रामस्थांच्या समस्येवर तोडगा काढून तातडीने या प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करावी आणि या प्रकल्पाचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवावा, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जावली तालुक्यात बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु आहे. बोंडारवाडी ग‘ामस्थांनी पिकाऊ शेतजमीन वाचावी आणि धरणाचे काम व्हावे, अशी मागणी करुन या प्रकल्पाला विरोध केला होता. ग‘ामस्थांच्या मागणीनुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी काही दिवसांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष धरणस्थळ आणि जागेची पाहणी केली होती. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा घडवून ग्रामस्थांच्या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, सहायक अभियंता (श्रेणी १) जयवंत बर्गे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे, शाखा अभियंता श्रीमती गडकरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, ज्ञानदेव रांजणे, बोंडारवाडी गावचे सरपंच बाजीराव ओंबळे, संदीप ओंबळे, विजय ओंबळे यांच्यासह बोंडारवाडी ग‘ामस्थ उपस्थित होते.
५४ गावांचा पाणीप्रश्‍न आणि बोंडारवाडी ग‘ामस्थांची शेतजमीन या दोन्ही बाबींचा विचार करुन सर्वांच्या सहमतीने, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेवून धरणाचे काम मार्गी लागले पाहिजे. ग्रामस्थांची समस्या जानुज घ्या आणि त्यावर तोडगा काढा. जागेचे अंतिम सर्वेक्षण करून धरणासाठीची जागा निश्चिती तातडीने करा. प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवा. तो मंजूर करून घेऊ, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही करून शासनाकडे प्रस्ताव पाठवू असे मिसळ यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!