
स्थैर्य, 17 जानेवारी, सातारा : येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि संस्कार भारती सातारा समिती यांच्या वतीने येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची फलश्रुती या विषयावर परिसंवाद आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ येत्या सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात आयोजिला आहे.
संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताचे प्रचार प्रमुख व विश्वस्त रूपेश कुंभार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून, अध्यक्षस्थानी दीपलक्ष्मीचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आहेत. या वेळी सातारा येथील साहित्य संमेलन यशस्वी
करून दाखवलेले संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि अटकेपार या स्मरणिकेचे व्यवस्थापकीय संपादक मुकुंद फडके यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी साहित्य संमेलनाची फलश्रुती या विषयावरील परिसंवादामध्ये प्रा. शेखर कुलकर्णी, उमा आठले, सविता कारंजकर, पद्माकर पाठकजी आणि वसंत शिंदे भाग घेणार आहेत.या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभघ्यावा, असे आवाहन दीपलक्ष्मीचे व्यवस्थापक विनायक भोसले, पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉ. संदीप श्रोत्री आणि संस्कार भारती- सातारा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी केले आहे

