फलटण भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकर्‍यांची आर्थिक लूट करणार्‍या खाजगी कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी लेखी स्वरुपात करण्यात आली आहे. फलटणचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, फलटण यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, फलटण भूमी अभिलेख कार्यालय फलटण येथे कार्यालयातील उपअधीक्षक सचिन पवार, मुख्यालय सहाय्यक सोनवलकर, निमतानदार बाबर, भुकरमापक, दुरुस्ती लिपिक, अभिलेख कक्ष लिपिक, व ईतर सर्व कर्मचारी यांनी भूमी अभिलेख कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या व महसूल विभागाच्या नियमाच्या विरोधात जाऊन अनेक खाजगी कर्मचार्‍यांची बेकायदेशररित्या नेमणूक केली असून सदर नेमणूक ही नियमबाह्य व शासनाच्या धोरणाच्या विरोधात आहे. याची चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तसेच तत्काळ भूमी अभिलेख कार्यालयात काम करणार्‍या सर्व खाजगी कर्मचार्‍यांना काढण्यात यावे व यातील दोषी सर्व सरकारी कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

वरील प्रकाराची चौकशी व कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या तोंडाना काळे फासून आंदोलन करणार आहे.

निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सातारा स्वाभिमानी शेतकरी संघटना धनंजय महामुलकर, प्रमोद गाडे, राज्य प्रवक्ते युवा आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नितीन यादव, अध्यक्ष, फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना, रविंद्र घाडगे, जिल्हा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाळासो शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, जितेंद्र खानविलकर, बाळासो खानविलकर व इतर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!