श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची भारतीय अन्न महामंडळात सहायकपदी आणि कर सहायकपदी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ जून २०२३ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील माजी विद्यार्थ्यांचे भारतीय अन्न महामंडळांतर्गत सहायकपदी आणि कर उत्पन्न नियामक सहकारी बँक अंतर्गत कर सहायकपदी निवड झाली.

भारतीय अन्न महामंडळांतर्गत सन २०२२-२३ मध्ये गट ‘क’ पदाची परीक्षा घेण्यात आली. भारतीय अन्न महामंडळांतर्गत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथील माजी विद्यार्थी कु. तेजस खानविलकर, मु. पो. कसबा पेठ, फलटण या माजी विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर गट ‘क’ पदी निवड झाल्याने महाविद्यालयाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढला आहे. तसेच कर उत्पन्न नियामक सहकारी बँक अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये गट ‘क’ पदाची परीक्षा घेण्यात आली. यामधून श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथील माजी विद्यार्थी शुभम इंगळे, मु. पो. राजुरी, ता. फलटण या माजी विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर गट ‘क’ पदी करसहायक म्हणून निवड झाल्याने महाविद्यालयाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर त्याने वाढविला आहे.

या निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद साताराचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे मे. गव्हर्निंग कौन्सिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधिक्षक श्री. श्रीकांत फडतरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे व स्पर्धा मंचचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सदरील परीक्षेसाठी महाविद्यालयातील स्पर्धा मंचचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!