दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२४ | फलटण |
‘रामबन हेरिटेज’, जाधववाडी (फलटण) येथील चि. श्रेयस सुधीर भांबुरे याची महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत सरळसेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पुणे विभागात ‘अॅग्रीकल्चर असिस्टंट’ या पदासाठी १४ व्या रँकने निवड झाली आहे.
श्रेयसचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे, माध्यमिक शिक्षण जयभवानी हायस्कूल तिरकवाडी, उच्च माध्यमिक शिक्षण श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फलटण, ग्रॅज्युअशन श्री शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय सावर्डे (चिपळूण) येथे झाले आहे व त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून त्याने हे यश पहिल्याच प्रयत्नात प्राप्त केले आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
या यशाबद्दल श्रेयसचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.