दैनिक स्थैर्य । दि. 16 ऑक्टोबर 2021 । फलटण । महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातारा जिल्ह्याकरीता स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यपदी होळ (ता.फलटण) येथील सागर कुमार कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबद्दल सागर कांबळे यांचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर उपस्थित होते.
सदर निवडीबद्दल सागर कांबळे यांचे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.