
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण, दि. 27 : जावली ता. फलटण येथील साप्ताहिक नमस्ते फलटणचे उपसंपादक राजकुमार आप्पासो गोफणे यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे. या निवडी बद्दल राजकुमार गोफणे यांचे विविध स्तरामधुन अभिनंदन होत आहे.
गोफणे हे गेली 20 वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असुन सामाजिक, शैक्षणिक कार्यात ही सहभागी असुन सामाजिक कामात कायम अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेवुनच त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आलेली आहे. आगामी काळात तळागाळातील सर्व सामान्य लोकांना घटक मानुन यापुढेही कार्यरत रहाणार असल्याचे राजकुमार गोफणे यांनी सांगितले.
