प्रमोद निंबाळकर यांची बिल्डर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय समितीमध्ये विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून निवड


स्थैर्य, फलटण, दि.०४: पश्मिच विभाग उपाध्यक्ष निरव परमार यांचे सुचनेनुसार, महाराष्ट्रातील फलटण सेंटरचे संस्थापक चेअरमन प्रमोद निंबाळकर यांची विशेष निमंत्रीत जनरल कौंसील सदस्य म्हणुन निवड केली आहे.

प्रमोद निंबाळकर यांना मिळालेल्या या संधीचा फायदा बांधकाम क्षेत्राला नक्की होईल, असे मत राज्य चेअरमन रणधीर भोईटे यांनी या निवडीनिमित्ताने व्यक्त केले.

सदर निवडीबद्दल प्रमोद निंबाळकर यांचे महाराष्ट्र राज्य सचीव दिलीप शिंदे, राज्य खजिनदार किरण दंडिले, फलटण सेंटर चेअरमन शफिक मोदी, व्हाईस चेअरमन दत्तात्रय बोबडे, सचिव महेश साळुंखे, भोजराज नाईक निंबाळकर, प्रमोद जगताप, विक्रम झांजुर्णे, प्रितम वडुजकर, सचीन निंबाळकर व फलटण सेंटरच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!