श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर पदवीसाठी निवड


स्थैर्य, फलटण दि.५ : फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण मधील अंतिम वर्षामधील 9 विद्यार्थ्याीं शैक्षणिक वर्ष 2020 – 21 च्या पदव्युत्तर पदवीसाठी निवड झाली आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, धुळे येथे श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टीकल्चर कॉलेजमधील करण  बनसोडे (फ्रुट सायन्स) व अमित नरुटे (फ्रुट सायन्स) यांची वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथे आणि कु.कल्याणी जाधव व कु.मेघना सस्ते यांची डॉ.बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठ, रोहा येथे (पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट) या विषयास तसेच शुभम भोसले (डेअरी सायन्स) या विषयास डॉ.बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठ, दापोली येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे.

तसेच कृषी महाविद्यालय, फलटण मधील कु.प्रगती तावरे (अ‍ॅग्रोनामी या विषयास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आणि कु.प्रेरणा नाईकरे (प्लॅन्ट पॅथॉलॉजी) डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, नागपूर येथे तर सौरभ कदम यांची (प्लॅन्ट पॅथोलॉजी) वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी ए.एस.निकम, अधिक्षक एस.बी.फडतरे यांनी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!