दैनिक स्थैर्य | दि. ३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
नुकत्याच कोल्हापुर येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेतील पहिला सामना इचलकरंजी म.न.पा. संघाविरुद्ध खेळण्यात आला. हा सामना ७-० ने जिंकून स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली. उपांत्यफेरीचा सामना कोल्हापूर जिल्हा विरुद्ध झाला. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. हा सामना ३-१ जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या उपांत्य सामन्यांमध्ये निर्णायक गोल संघाची कर्णधार राष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. अनुराधा ठोंबरे हिने २ गोल नोंदवले. या स्पर्धेतील अंतिम सामना कोल्हापूर म.न.पा. संघाविरुद्ध झाला. हा सामना ६-० ने जिंकून विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या संघाची निवड राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी झाली.
या विजय संघामध्ये फॉरवर्ड लाईनमध्ये कु. निकिता वेताळ, कु. श्रुती भोसले कु. श्रुतिका घाडगे, कु. साक्षी पुजारी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले. हाफ लाईनमध्ये कु. श्रेया चव्हाण, कु. शिफा मुलानी, कु. तेजस्विनी कर्वे व कु. श्रद्धा तांबे यांनी चांगली कामगिरी केली. तसेच बचाव फळीमध्ये कु. अनुराधा ठोंबरे, कु. अनुष्का केंजळे, कु. सृष्टी जावीर व कु. अनुष्का सपाटे यांनी उत्कृष्ट खेळ केला. गोलकीपर म्हणून कु. अनुष्का चव्हाण हिने देखील चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
या संघामध्ये नुकत्याच छत्तीसगड येथे झालेल्या पहिल्या वेस्ट झोन राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ब्रांझ मिळवलेले व महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केलेल्या कु. श्रेया चव्हाण, कु. शिफा मुलानी व कु. यांचा देखील समावेश होता.
या विजय संघाला सीनियर हॉकी मार्गदर्शक श्री. महेश खुटाळे सर, श्री. सचिन धुमाळ सर, क्रीडा शिक्षक श्री. खुरंगे बी. बी. व कु. धनश्री क्षीरसागर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
या विजय संघास व त्यांना मार्गदर्शन करणार्या क्रीडा मार्गदर्शकांना विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर, स्कूल कमिटीचे व्हा. चेअरमन रमणलाल दोशी, सदस्य श्री. शिरीष शरद कुमार दोशी, डॉक्टर पार्श्वनाथ राजवैद्य, क्रीडा समितीचे सदस्य श्री. शिरीष वेलकर, श्री. महादेव माने, श्री. संजय फडतरे, श्री. तुषार मोहिते, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. तायप्पा शेडगे तसेच मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गंगवणे बी. एम., उपप्राचार्य श्री. ननवरे ए. वाय. ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. देशमुख डी. एम . पर्यवेक्षक श्री. शिंदे व्ही.जी., बगाडे मॅडम, श्री. जाधव जी. ए., प्रशालेतील सर्व शिक्षक व क्रीडा शिक्षक तसेच दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहुबली शहा, उपाध्यक्ष श्री. सचिन लाळगे सदस्य श्री. प्रवीण गाडे, श्री. महेंद्र जाधव, माजी राष्ट्रीय खेळाडू श्री. सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.