
दैनिक स्थैर्य | दि. १६ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, क्रीडा महोत्सव २०२४ या स्पर्धा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे होत असून या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या संघात मुधोजी महाविद्यालयातील खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारात निवड झाली आहे.
वैष्णवी फडतरे व्हॉलीबॉल, श्रद्धा शिंदे व्हॉलीबॉल, पूजा फडतरे खो-खो, साक्षी कुंभार खो-खो, आदित्य ढेंबरे बास्केटबॉल, प्रा.डॉ.स्वप्नील पाटील प्रशिक्षक व्हॉलीबॉल या सर्वांचा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चमूमध्ये समावेश झाला आहे.
या खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एच. कदम सर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.