
दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२४ | फलटण | फलटण येथील नामांकित व कायमच १०० % निकालाची उज्ज्वल परंपरा असणार्या गिरीधर सायन्स अकॅडमीचा विद्यार्थी जयदीप कदमचे आयआयटी बॉम्बेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी सिलेक्शन झाले आहे.
या यशाबद्दल त्याचे आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटणच्या प्रेसिडेंट डॉ. वैशाली शिंदे, गिरीधर सायन्स अकॅडमीचे संस्थापक शिवराज भोईटे सर, मयूर भोईटे सर आणि मंदार पाटसकर सर यांनी अभिनंदन केले.
जयदीप कदमने १२ वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याने ९९.७५ पर्सेंटाइल गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच जयदीप कदम याने ‘जेईई मेन’ परीक्षेत ९५.९३ टक्के आणि ‘जेईई अॅडव्हान्स (एअर (सीटीजी)) या परीक्षेत ७८ वी रँक मिळविली आहे.