दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । फलटण । महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत सातारा जिल्हा, बाल कल्याण समितीच्या सदस्यपदी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय फलटण मधील विभाग प्रमुख मानसशास्त्र विभाग व प्र. प्राचार्य डॉ.दिपक रामचंद्र राऊत-पवार यांची महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य. यांच्यामार्फत बाल कल्याण समिती सदस्य (मानसोपचार तज्ज्ञ) म्हणून तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली असून नुकताच त्यांनी या पदाचा कार्यभार सातारा येथे स्वीकारला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी असणारी अशा प्रकारची समिती ही काळजी, संरक्षण व न्यायाची गरज असलेल्या बालकांच्या कल्याणासाठी हि समिती कार्यरत असते. प्रा.डॉ.दिपक राऊत- पवार यांनी मानसशास्त्र विषयात डॉक्टरेट (Ph.D )पदवी प्राप्त केली असून त्यांना भारतीय पुनर्वास परिषद(RCI)नवी दिल्ली यांचेमार्फत तज्ञ मानसशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे मनोविकास मानसशास्त्रीय समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र असून या केंद्रामार्फत मुलांचे बुद्ध्यांक मापन,कलमापन, व्यवसाय मार्गदर्शन,मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन व समुपदेशन इ. कार्य करत असतात. त्यांच्या या नियुक्तीबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष माननीय श्री.सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) मानद सचिव माननीय डॉ.श्री.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य माननीय श्री.महेंद्रभैय्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा.डॉ.दिपक राऊत – पवार हे आपली निवड सार्थ ठरवतील व आपल्या ज्ञानाचा उपयोग बालकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन करतील अशी अपेक्षा मा.डॉ.श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके)यांनी व्यक्त केली आहे. श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या संकुलातील सर्व शाखांचे प्राचार्य,उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे खास अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.