
दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । खटाव तालुक्याच्या वर धनगर येथील सामाजिक कार्यकर्ते असलमभाई सय्यद शिकलगार यांची राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण समितीच्या राज्य संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
असलमभाई शिकलगार हे विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. शासन दरबारी त्यांनी मानवी हक्क संदर्भात अनेक प्रश्न मांडले असून त्यांच्या या कामाची दखल घेत राष्ट्रीय मानव अधिकारी व भ्रष्टाचार निवारण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार वर्धनगड येथील मुस्लिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गफूरभाई शिकलगार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कायदेशीर सल्लागार ॲड. जावेदभाई शिकलगार, रियाजभाई शिकलगार व इतर ट्रस्टी उपस्थित होते.