दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष श्री. सिकंदर मन्सूर डांगे यांचे सुपुत्र श्री. आमिर सिकंदर डांगे यांची एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तालुका कृषी अधिकारी (वर्ग-२) पदी निवड झाल्याबद्दल फलटण तालुका व सातारा जिल्हा कंत्राटदार महासंघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.