दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२१ । सातारा । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झालेल्या इंटर झोनल पुरुष व महिला विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी ८ सुवर्णपदक व ४ खेळाडूंनी रौप्यपदक अशी एकूण १२ पदकांची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या ८ खेळाडूंची पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या बॉक्सिंग संघात निवड झाली आहे.
यशश्री धनावडे, पूजा निकम, रिशिका होले, भूषण रोमण, शुभम झांबरे, ओमकार गाढवे, वैभव माळी, मधुर भोसले या खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले असून त्यांची पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना मानद बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप व विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, विभागीय सचिव योगेश मुंदडा, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरीश शेट्टी, अमर मोकाशी, रवींद्र होले, संजय पवार, प्राध्यापक डॉ.विकास जाधव, विजय मोहिते, बापूसाहेब पोतेकर, तेजस यादव, अंकुश माने यांनी यशस्वी खेळाडूंचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.