विनापरवाना लाकडाची वाहतूक करणारा कंटेनर पकडला; वन विभागाची कारवाई : दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१९ नोव्हेंबर २०२१ । वाठार स्टेशन । वाठार स्टेशन येथील वन खात्याकडून नांदवळ ता. कोरेगाव येथे विना परवाना लाकडाची वाहतूक करणार्‍या कंटेनरवर कारवाई करून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपोडे -सोळशी मार्गावर नांदवळ लगत असणार्‍या गणेश मंगल कार्यालयाजवळ संध्याकाळी साडेसहा वाजता कंटेनर क्रमांक एमएच 14 बीजे 2572 मधून विना परवाना लाकडाची वाहतूक करीत असल्याचे वन खात्याच्या कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये करंज, अनगड असा बिना शिक्याचा लाकूड माल बाबासो किसनराव शिंदे रा.तांबवे ता. फलटण जि. सातारा हे कंटेनरमधून विना परवाना लाकडाची वाहतूक करीत असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याचे दिसून आल्याने सदरचे वाहन लाकूड मालासह जप्त करून वाठार स्टेशन येथील वनपाल कार्यालयात सुरक्षित लावण्यात आले.

केलेला लाकूड माल व कंटेनर याची अंदाजे किंमत दहा लाख सोळा हजार असून त्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (2) ब अंतर्गत कारवाई केली आहे. सदरची कारवाई उपवन संरक्षक महादेव मोहिते, सहा,वन संरक्षक रेश्मा व्होरकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव घार्गे वनक्षेत्रपाल कोरेगाव,एस,एस निकम वनपाल वाठार, श्रीमती ए,यु, पवार, वनरक्षक बी बी मराडे, एस वि शेलार वनमजुर, शिंदे, चव्हाण,गायकवाड,जाधव यांनी सहभाग घेऊन सदर कारवाई केली.


Back to top button
Don`t copy text!