काळूबाई व दावजी बुवा यात्रेनिमित्त 1973 चे कलम 144 लागू जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.१५: कोरोना विषाणूचा प्रादुभार्व रोखण्याच्या अनुषंगाने काळूबाई देवी यात्रा ता. वाई व दावजी बुवा यात्रा सुरुर या यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात आले असून या यात्रेनिमित्त जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत फौजदारी दंड संहिता प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आदेश लागू केले आहेत.

या आदेशानुसार काळूबाई देवी यात्रा, मांढरदेव ता. वाई व दावजी बुवा यात्रा सुरुर यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांनीच पार पाडावी. त्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई असेल. तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंद असेल.

यात्रा कालावधीत भाविकांना तसेच स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारण्यास तसेच पशू व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत वाई ताकुक्यातील मौजे मांढरदेव गावासह मांढरदेव गावापासून 10 किलोमिटर परिसर, मौजे परखंदी, डुईचीवाडी, पिराचीवाडी, बालेघर, सुलतानपूर, लोहारे, वेरुळी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, एमआयडीसी वाई, शहबाग, अंबाडे खिंड, बोपर्डी, धावडी फाटा रेणुसेवस्ती, गुंडेवाडी, कोचळेवाडी, काळुबाई मंदिर जमादाडे वस्ती शेजारी वाई, वाई शहर व सुरुर तसेच खंडाळा तालुक्यातील कर्नवडी, झगलवाडी, अतिट व लिंबाचीवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्यंने एकत्र येणे अथवा गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!